आपला जिल्हा

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार माजलगाव विधानसभा निरीक्षकपदी अतुल गावंडे

माजलगाव : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) माजलगाव विधानसभा निरीक्षकपदी छत्रपती संभाजीनगरचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने पक्ष वाढीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे निष्ठावंत छत्रपती संभाजीनगरचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे यांची माजलगाव विधानसभा निरीक्षकपदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब यांनी पत्रान्वये नियुक्ती केली आहे. नियुक्तीपत्रात म्हटले आहे, पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी सर्व ताकदीनिशी योगदान देत समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोच करण्यासाठी आपण माजलगाव विधानसभा निरीक्षक म्हणून काम करावे, असे निर्देश पक्षाने गावंडे यांना दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत नेणार : अतुल गावंडे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) माजलगाव विधानसभा निरीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना छत्रपती संभाजीनगरचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अतुल गावंडे म्हणाले, महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि विकासात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांचे फार मोठा योगदान आहे. महाराष्ट्राचे हीत जोपासणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजलगाव विधानसभा निरीक्षकपदी संधी दिली त्याबद्दल सर्व वरिष्ठांचे धन्यवाद मानतो. तळागाळात पक्ष वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अतुल गावंडे यांनी दिली.

Comment here