रामहारी राऊत यांची माहिती; माजलगावात पत्रकार परिषद
माजलगाव : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतुन रूग्णांच्या मदतीसाठी ना वशिला, ना ओळख थेट मदत दिली जात असुन गोरगरीब – गरजू रूग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आशेचा किरण ठरत आहे. दोन वर्ष एक महिन्यांच्या कालावधीत राज्यातील ३६ हजारांहून अधिक रूग्णांना ३०१ कोटी रूपयांचे अर्थसहाय्य वितरीत करत कक्षाने विक्रम रचला असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहारी राऊत यांनी दिली आहे.
शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आज सोमवार दि.५ ऑगस्ट रोजी ते बोलत होते. पत्रकार परिषदेस शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम येवले, भगीरथ तोडकरी, महेश बोटवे, आदित्य धारक, यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक निधीमध्ये रूग्णालयात अंगीकृत करण्याची आणि सहाय्यता निधीमधून रूग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातुन दुर्धर आजाराने ग्रस्त रूग्णांना दोन वर्षांच्या कार्यकाळात तीनशे एक कोटी रूपयांचे अर्थसहाय्य वितरीत केले. मुंबई येथील कार्यालयातुन २७४ कोटींपेक्षा तर नागपूर कार्यालयातुन २७ कोटी रूपयांचे अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले. ३६ हजारांहून अधिक गंभीर रूग्णांचे प्राण वाचले आहेत यातुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशिलतेचा प्रत्यय आला. विशेष म्हणजे ऑनलाईन अर्जांवर रूग्णांना मदत मिळते. रूग्णांनी किंवा नातेवाईकांनी स्वतः थेट अर्ज करून मदत मिळविता येते. यासाठी संपर्क 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट मोबाईलवर अर्ज मिळवा आणि aao.cmrf-mh@gov.in या ईमेलवर अर्ज करा असे आवाहन केले.
राज्याचे संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखिल करण्यात आला आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे. दुर्धर आजारांनी ग्रस्त रूग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तित जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी केले आहे.
‘ना वशिला, ना ओळख; थेट मिळते वैद्यकीय मदत’
ना वशिला, ना ओळखीची आवश्यकता नसून वैद्यकीय मदतीसाठी रूग्ण आणि रूग्णांच्या नातेवाईकांनी थेट मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाशी संपर्क साधावा. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क असल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी वेळोवेळी सांगितले आहे.
पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
माजलगाव तालुक्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत वैद्यकीय सेवा मिळाव्यात म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने माजलगाव तालुकाप्रमुखपदी महेश बोटवे (संपर्क : 7410768800) माजलगाव तालुका उपप्रमुखपदी अमोल धारक (संपर्क : 9405868080) वैद्यकीय सहाय्यकांची नियुक्ती करण्यात असल्याचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी नियुक्तीपत्र देऊन जाहीर केले. याप्रसंगी माजलगावचे शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम येवले, भगीरथ तोडकरी, संकेत लांडगे यांनी उपस्थिती होती.
Comment here