आपला जिल्हा

तपोनुष्ठानानंतर श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराजांचे जंगी स्वागत

श्रावणमासानिमित्त श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे केले तपोनुष्ठान

बीड : वीरशैव समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या माजलगाव येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठाचे मठाधिपती शिवाचार्य चंद्रशेखर महाराज यांनी बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणात महिनाभर तपोनुष्ठान केले. तपोनुष्ठानाची सांगता झाल्यानंतर ४ सप्टेंबर रोजी त्यांचे माजलगाव नगरीत उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी सायंकाळी ७ वाजता माजलगाव मठ परिसरात श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराजांची मिरवणूक काढण्यात आली.

माजलगाव येथील सदगुरू श्री मिस्कीन स्वामी मठाचे मठाधिपती लिंगैक्य प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्यानंतर उत्तराधिकारी म्हणून श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांचा पट्टाभिषेक करण्यात आला. श्रीगुरू चंद्रशेखर शिवचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संस्थान मठ माजलगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. उत्तराधिकारी झाल्यानंतर मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी श्रावणातील पहिले सन २०२२ साली माजलगावकर मठातील लिंगैक्य प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्या समाधीजवळ केले होते. दुसरे तपोनुष्ठान श्रीक्षेत्र कपिलधार येथे तर यंदा श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे तिसरे तपोनुष्ठान केले. या तपोनुष्ठानाची सांगता झाल्यानंतर श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी श्रीक्षेत्र कपिलधार येथे संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधीची महाआरती केली. माजलगावकर मठाच्या वतीने सुरू असलेल्या अन्नदानाचे उद्यापन केले. यानंतर त्यांचे माजलगाव नगरीत आगमन झाल्यानंतर भक्तांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. माजलगावकर मठ परिसरात शिवाचार्य चंद्रशेखर महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. मठात आगमन झाल्यानंतर सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी आणि लिंगैक्य प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्या समाधीची महाआरती करून दर्शन घेतले. यानंतर त्यांनी उपस्थित भाविकांना धर्मोपदेश केला.

श्रावणमास तपोनुष्ठानानिमित्त श्रीक्षेत्र भीमाशंकर महादेव मंदिरात पूजाअर्चा करताना श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज 

श्रावण मासानिमित्त श्रीक्षेत्र कपिलधार येथे श्री मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधीस आरती करताना श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज

Comment here