महा-राष्ट्र

आरोग्यसेवेतील अग्रदूत मंगेश चिवटे यांचा एनडीटीव्ही मराठीत गौरव

श्रींच्या आरतीचा मिळाला मान 

मुंबई : आरोग्य सेवेचा यज्ञ अविरत तेवत ठेऊन राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णासाठी आरोग्यदूत ठरलेले मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या कार्याचा एन.डी.टीव्ही मराठी वृत्त वाहिनीच्या कार्यालयात गौरव आला.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी एन.डी.टीव्ही मराठी वृत्त वाहिनीच्या कार्यालयात श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी व्यवस्थापकीय संपादक संजय गुगलिया यांच्या समवेत श्री. गणरायाची आरती करण्याचा मान मिळाला. आरोग्य सेवेत अविरत कार्य करणारे मंगेश चिवटे पूर्वाश्रमीचे पत्रकार आहेत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओएसडी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या आरोग्य सेवेतील योगदानाबद्दल वरिष्ठ पत्रकार सर्व श्री. रौनक कुकडे, विनोद तळेकर, राहूल खिचडी, कविता राणे, सागर कुलकर्णी आदींनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी आरोग्यदूतचे संपादक बाबा श्रीहरी देशमाने, महेश क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

Comment here