धारूर : तालुक्यातील जैतापुर -देवठाणा ग्रुप ग्रामपंचायत च्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी गणेश लक्ष्मण सोळंके यांची मंगळवारी सर्वानुमते निवड करण्यात आली.
सरपंच भागवत दराडे यांच्या सह ग्रामसेवक मनोज डांगे, दिपक सोळंके, वसंत सोळंके, अशोक दराडे, दत्ता सोळंके, आबा महाराज सोळंके, समाधान चव्हाण यांनी देवठाणा जैतापूर ग्रुप ग्रामपंचायत च्या तंटामुक्ती पदी गणेश लक्ष्मण सोळंके यांची सर्वानुमते निवड केली. गणेश सोळंके यांचे गावात सर्वांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सोळंके धावून जात मदत करतात यामुळे त्यांची ही निवड करण्यात आल्याचे सरपंच भागवत दराडे यांनी माध्यमांना सांगितले. गणेश सोळंके यांच्या निवडीनंतर गावात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comment here