आपला जिल्हा

निर्धार महामेळाव्यात मोहन जगताप विधानसभेचे रणशिंग फुंकणार

माजलगावात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकीत केली घोषणा

माजलगाव : महाराष्ट्रात आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजवू शकते या अनुषंगाने छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन जगताप यांनी माजलगाव, धारूर व वडवणी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची माजलगाव येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात शुक्रवारी बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. येत्या २९ सप्टेंबर रोजी माजलगावातील जुना मोंढा मैदान येथे कार्यकर्त्यांचा निर्धार महामेळाव्याचे आयोजन करून या ठिकाणी विधानसभेचे रणसिंग फुंकणार असल्याचे या बैठकीवेळी जगताप यांनी घोषणा केली.

या बैठकीदरम्यान उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त करत असताना मोहन जगताप यांनी वरिष्ठ नेत्यांच्या कोणत्याही दबावांमध्ये न येता आगामी विधानसभा लढवावी अशी भावना व्यक्त केली. तसेच प्रत्येक वेळेस मोहन जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्यांसाठी काम करायचे आमदार करायचे परंतु मोहन जगताप  यांना संधी कधी मिळणार, वरिष्ठ नेत्यांचा मान ठेवून निवडणुकीमध्ये माघार किती वेळेस घ्यायची आणि कार्यकर्त्यांनी मतदारसंघ बाहेरील उमेदवारासाठी काम कधीपर्यंत करायचे अशी भावना व्यक्त करत मोहन जगताप यांना निवडणुकीच्या मैदानात उतरावे असे मत कार्यकर्त्यांनी याठिकाणी व्यक्त केले.

यावेळी मोहन जगताप म्हणाले, मी मागील तीस वर्षापासून राजकारण करतो मागील चार टर्म मला दुसऱ्याला आमदार करण्यासाठी फिरावे लागले. मला आज ना उद्या न्याय मिळेल या भावनेने मी दुसऱ्यांचे काम करीत राहिलो, पण आता आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मी जनतेसमोर जाणार असून मी मतदारसंघात पूर्ण वेळ उपलब्ध असून नेहमी मतदारसंघातील अडीअडचणी सोडविण्यासाठी तत्पर असतो. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माझा पक्ष कोणताही असो अथवा अपक्ष लढण्याची वेळ आली तरी मी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे या बैठकीत दरम्यान कार्यकर्त्यांना मोहन जगताप यांनी सांगितले. तसेच येत्या २९ सप्टेंबर रोजी माजलगाव येथील जुना मोंढा मैदान येथे कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर निर्धार महामेळाव्याचे आयोजन करून या ठिकाणी विधानसभेचे रणसिंग फुंकणार असल्याचे या बैठकीवेळी त्यांनी घोषणा केली. या बैठकीला माजलगाव धारूर व वडवणी येथील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Bhagirath Todkari Administrator
Sorry! The Author has not filled his profile.
×
Bhagirath Todkari Administrator
Sorry! The Author has not filled his profile.
Latest Posts

Comment here