माजलगावात कन्या अपत्य दिन साजरा
माजलगाव : आजच्या परिस्थितीत देशात महिलांच्या अत्याचारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे महिलांनी स्वरक्षणाकरिता सक्षम झाले पाहिजे, असे प्रतिपादन ॲड.आरती कांडूरे-गाडेकर यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी नवविकास महिला मंडळ द्वारा संचलित महिला व्यासपीठ आयोजित कन्या अपत्य दिन कार्यक्रमात बुधवार, दि.2 ऑक्टोबर रोजी अनंत भालेराव सभागृह महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात आजच्या स्त्रीची सुरक्षितता या विषयावर बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲड.सिताराम शर्मा हे तर प्रमुख उपस्थितीत माजी आमदार डी.के.देशमुख, ॲड.आरती कांडूरे-गाडेकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना श्रीमती कांडूरे यांनी आजच्या स्त्रीची सुरक्षितता विषयी व महिला कायदा विषयी माहिती व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात महात्मा फुले शाळेतील आदर्श शिक्षक गणेश राधाकिसन राठोर यांना रोटरी क्लब ऑफ माजलगाव नेशन बिल्डर अवॉर्ड -२०२४ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तर मी हिरकणी ग्रुपच्या वतीने लोककलेत भारुडाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास आर.डी.भिलेगावकर, आर.बी.देशमुख, शिरीष देशमुख, डॉ.सचिन देशमुख, राहुल मुळी यांचेसह महात्मा फुले शाळेतील शिक्षक वृंद व पालक व विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नवविकास मंडळ व महिला मंडळ संचलित चे सर्व संचालक उपस्थित होते.
Comment here