आपला जिल्हा

जनतेचा आदर ठेवून निवडणूक रणांगणात उतरणार

प्रा.ईश्वर मुंडे यांचा एल्गार; अपक्ष निवडणूक लढविण्याची जय्यत तयारी

माजलगाव : देशाचे नेते पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विस्तार अधिकारी पदावरून स्वेच्छा सेवा निवृत्ती घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात धारूर तालुकाध्यक्ष, ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस, सेवानिवृत्त अधिकारी सेल राज्यप्रमुख या पदावर पक्षाचे सक्रीय काम करून खासदार शरदचंद्र पवार यांचे व पक्षाचे विचार वाडी, वस्ती, तांड्यापर्यंत पोहचवले. सन २०१९ ला माजलगाव मतदार संघाचा आमदार निवडून आनला. पक्ष फुटल्यानंतर ही निष्ठेने खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षातच राहीलो. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करून जनसामान्यांच्या मनात घर केलेले आहे.

सन २०२१ ला छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात उमेदवारी मागणी केलेली होती, २०२४ ला बीड लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढवून बीड लोकसभेच्या उमेदवारीची मागणी केलेली होती. वरील दोन्ही वेळी मला पक्षाने आपला नंतर विचार करू असे सांगून थांबवले. आता सन २०२४ च्या माजलगाव विधानसभा निवडणूकीसाठी पक्षाकडे रितसर उमेदवारीची मागणी करून माजलगाव मतदारसंघातील शंभर गावात जन संवाद दौरा करून पक्षाचे कार्य वाढवलेले आहे. माझ्या परिचय पत्राच्या ५० हजार प्रति मतदारसंघातील सर्व गावांमध्ये वाटप केलेल्या आहेत. यावेळी माजलगाव मतदारसंघात माझ्या विषयी मतदारांमध्ये सहानुभूती असून पक्षाने आपणास संधी द्यावी अशी जन भावना होती. या मुळे मी निश्चित निवडणूक जिंकू शकत होतो. परंतू असे न होता मला पक्षाने निवडणूक लढण्याची संधी व तिकीट दिले नाही. यामुळे मतदारसंघातील जनता नाराज झालेली असून तुम्ही अपक्ष निवडणूक लढवावी आम्ही तुमच्या पाठीशी आहेत हा दबाव माझ्यावर वाढत असल्यामुळे मी माजलगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक – २०२४ जनतेच्या विश्वासावर अपक्ष लढवणार असून सोमवार दि.२८ आॅक्टोबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

Comment here