माजलगाव : माजलगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांची उमेदवारी जाहीर होतात माधव निर्मळ यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे सुपूर्त केला आहे. दरम्यान, माधव निर्मळ माजलगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारच असल्याचे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.
माधव निर्मळ यांनी गुरूवारी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना निर्मळ म्हणाले, की मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे आणि जनतेच्या आशिर्वादाने ही निवडणूक मी जिंकणार आहे. माजलगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. माजलगाव, वडवणी, धारूर या तिन्ही तालुक्यात दौरे केले असून जनतेचा मला प्रचंड प्रतिसाद आहे. त्यामुळे मी ही निवडणूक लढवण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली होती आणि पक्षाकडे तिकिटाची मागणी केली परंतुपक्षाने माझ्या उमेदवारी ला मंजुरी दिली नाही आणि त्यांनी विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली यामुळे मी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे . जनता माझ्या पाठीमागे असून जनताजनार्धन आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवत आहे. तेव्हा जनता मलाच विजयी करेल असा आत्मविश्वास माधव निर्मळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
Comment here