आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात ६७.३४ टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

बीड : जिल्ह्यात सहाही विधानसभा मतदारसंघात नवमतदारांसह मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात अंदाजे सरासरी ६७.३४ टक्के मतदान झाले.

सहाही विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजता सुरू झालेल्या मतदानासाठी नऊपर्यंत अंदाजे सरासरी ६.८८ टक्के मतदान झाले. तसेच अकरा वाजता १७.४१, एक वाजता ३२.५८, तीन वाजता ४६.१५, पाच वाजता ६०.६२ टक्के अंदाजे मतदान झाले, तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६७.३४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतरही काही ठिकाणी रांगेतील मतदारांचे मतदान सुरू होते.

Comment here