नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या असून माजलगाव विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदारांनी आमदार प्रकाश सोळंके यांना पाचव्यांदा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. मागील ३५ वर्षांमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांनी मोठ्या प्रमाणात माजलगाव मतदारसंघात विविध विकासकामे कामे करून मतदारसंघात विकासाची गंगा आणलेली आहे. आमदार प्रकाश सोळंके यांनी जलसिंचनाचे अनेक प्रश्न मार्गी लावल्याने मतदारसंघातील बहुतांशी शेतकरी आज आर्थिक व सामाजिक दृष्ट्या समृध्द झाला आहे.
त्याचबरोबर माजलगावसह अन्य ठिकाणी एमआयडीसीचे काम प्रगतीपथावर आहे. याठिकाणी सुशिक्षीत बेरोजगार युवकांना रोजगाराची सोय उपलब्ध झाली आहे. या विकासाकामाच्या बळावरच मतदारसंघातील जनतेने आमदार प्रकाश सोळंके यांना पाचव्यांदा मतदारसंघात निवडून दिले आहे. त्यामुळे आमदार प्रकाश सोळंके यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा वासाठी शिष्टमंडळाने पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजलगाव तालुका सरचिटणीस अॅड.प्रमोद तौर यांनी दिली आहे.

अॅड.प्रमोद तौर



Comment here