बीड तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनची निवडणूक बिनविरोध
बीड : बीड तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोधपणे पार पडली. अध्यक्षपदी कल्याण आखाडे यांची, तर उपाध्यक्ष म्हणून प्रकाश कवठेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बीड तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सावता नागरी पतसंस्थेच्या मुख्य शाखेत विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. या सभेप्रसंगी संचालक मंडळ व अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. सन २०२५ ते २०३० या कालावधी करता निवड झालेल्या संचालक मंडळामध्ये कल्याण आखाडे व प्रकाश कवठेकर यांच्यासह लहुराव राऊत, रविंद्र वाघमारे, रघुनाथ खरसाडे, सखाराम शिंदे, सुवर्णमाला संतराम शिंदे, शिवकन्या अशोक राऊत, बालिका संतोष सपकाळ यांचा समावेश आहे. संचालक मंडळाच्या पहिल्या मासिक सभेत रिक्त असलेल्या दोन जागांसाठी व स्वीकृत संचालकांच्या दोन जागांसाठी निवड करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी म्हणून पी.एस.रोडे यांनी काम पाहिले, तर सहकार अधिकारी एस.एल.बेटकर, सावता पतसंस्थेचे व्यवस्थापक रमेश मदने यांनी सहकार्य केले.
Comment here