माजलगाव : येथील मराठवाडा साहित्य परिषद शाखेच्या वतीने घेण्यात येणारे १६ वे शिवार साहित्य संमेलन माजलगावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या निसर्गरम्य परिसरातील प्राचार्य रा.रं.बोराडे साहित्यनगरीत रविवार, दिनांक ११ मे रोजी आयोजित करण्यात आले आहे.
सकाळी ९:०० वाजता श्री ह.भ.प.आदिनाथ महाराज कुंडकर यांच्या हस्ते ग्रंथ पूजन होणार आहे. सकाळी ९:३० वाजता या शिवार साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ .दीपा क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष ना.मा. पडलवार अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे नवनिर्वाचित सदस्य दगडू लोमटे, अनंत कराड , निमंत्रित सदस्य प्रभाकर साळेगावकर, मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन समिती सदस्य डॉ. योगिता होके पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी पूर्वाध्यक्ष अनिलकुमार साळवे, स्वागताध्यक्ष भारत होके यांची उपस्थिती राहणार आहे. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.रमेश गटकळ हे करणार असून आभार शरद रांजवण मानणार आहेत. दुसऱ्या सत्रात सकाळी ११:०० वाजता प्रसिद्ध कथाकार गेणू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार आहे. यामध्ये परभणी येथील प्रसिद्ध कथाकार अर्चना डावरे यांचा सहभाग आहे. या सत्राचे सूत्रसंचालन नारायण झोडगे हे करणार असून आभार विशाल वायाळ मानणार आहेत.
दुपारी २:०० वाजता ज्येष्ठ कवयित्री प्रतिभा थिगळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. यामध्ये माजलगाव व परिसरातील कवींचा सहभाग राहणार आहे. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन गोविंद गोचडे, गीता सोळंके हे करणार असून आभार मोहन राठोड मानणार आहेत. शिवार साहित्य संमेलनाचा समारोप दुपारी ४:०० वाजता होणार आहे. या सत्राचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध वात्रटिकाकार प्रा.सत्यप्रेम लगड हे आहेत. यावेळी संमेलनाध्यक्ष ना.मा.पडलवार यांची उपस्थिती राहणार आहे. समारोप सत्राचे सूत्रसंचालन खेलबा काळे हे करणारा असून आभार बालाप्रसाद चव्हाण हे मानणार आहेत. यावेळी विविध ठराव घेतले जाणार आहेत. या शिवार साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष भारत होके, मसापचे अध्यक्ष मुकुंदराज सोळंके, उपाध्यक्ष प्रा.स्नेहल पाठक, कार्यवाह प्रा.डॉ.भाऊसाहेब राठोड, कोषाध्यक्ष किशोर गुंजकर, सहकार्यवाह बालासाहेब झोडगे, प्रा.डॉ.उमेश साडेगावकर, कार्यकारिणी सदस्य प्रा.हिरामण डावरे, डॉ.अंगद गायकवाड, प्रा.संगीता जाधव, पुरुषोत्तम जाधव, प्रा.बालाजी बोडके, शरद रांजण निमंत्रित सदस्य डॉ.योगिता होके पाटील, गौरी देशमुख, डॉ.प्रज्ञा जोशी यांनी केले आहे.



Comment here