माजलगाव : तालुक्यातून जात असलेल्या खामगाव-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग धारूर रोड, माजलगाव ते लहामेवाडी पर्यंत अक्षरशः मृत्यूचा सापळा निर्माण झाला आहे. या ठिकाणी जवळपास पाच ते सहा जणांचे नाहक बळी गेले आहेत. तर शेकडो जण गंभीर जखमी झाले आहेत. सरकार आणखी किती जणांचे बळी घेणार आहे, असा उद्विग्न सवाल माजलगाव नगर परिषदेचे माजी सभापती तौफीक पटेल यांनी विचारला आहे.
खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग माजलगाव तालुक्यातून जातो. धारूर रोड, माजलगाव ते लहामेवाडी पर्यंत रस्त्याच्या मधोमध मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेलेले आहेत. या प्रकारामुळे मागील काही वर्षांत पाच ते सहा जणांचे बळी गेलेले आहेत. यात नामांकित अॅड.घुबडे आणि अभियंता शेजुळ यांचा समावेश होतो. त्याचबरोबर शेकडो दुचाकीस्वार पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झालेली आहे. या रस्त्यावरून शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी दुचाकीवरून ये-जा करतात. मात्र रस्त्याला पडलेल्या मोठमोठ्या भेंगामुळे दुचाकीस्वार अडकून पडल्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. याकडे तौफीक पटेल यांनी शासनाचे लक्ष वेधले. शासन आणखी किती जणांचे बळी घेणार आहेत? असा रास्त सवाल पटेल यांनी व्यक्त केला. धारूर रोड, माजलगाव ते लहामेवाडी पर्यंतच रस्त्याची एवढी दुरावस्था का झाली? याबद्दल शंकाही तौफीक पटेल यांनी व्यक्त केली. या रस्त्याच्या दुरावस्थेला जे जबाबदार आहेत. त्यांची कसून चौकशी करण्याची मागणीही तौफीक पटेल यांनी लावून धरली आहे. रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी, जेणेकरून जनसामान्य लोकांना दिलासा मिळेल शासन आणखी किती जणांचा बळी घेणार आहे? असा उद्विग्न सवाल तौफीक पटेल यांनी विचारला आहे.

‘रस्त्याच्या दुरावस्थेप्रश्नी नितीन गडकरींना भेटणार’
खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग धारूर रोड, माजलगाव ते लहामेवाडी पर्यंतच्या कामाची तक्रार थेट केंद्रीय व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नवी दिल्लीत भेट घेऊन करणार आहे, अशी माहिती माजलगाव नगर परिषदेचे माजी सभापती तौफीक पटेल यांनी दिली. माजलगाव ते लहामेवाडी पर्यंत रस्ता डागडुजीची तातडीने गरज आहे. या मार्गावरील पन्नास गावांचा माजलगावशी थेट संपर्क असतो. अशा ज्वलंत प्रश्नी शासन गाफिल कसे राहू शकते. याकडेही मंत्री गडकरी यांचे लक्ष वेधणार असल्याचेही पटेल यांनी सांगितले.
हजारो नागरिक रास्ता रोकोत सहभागी होणार : पटेल
खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग धारूर रोड, माजलगाव ते लहामेवाडी पर्यंत रस्त्याची झालेली दुरावस्था आणि त्यातून वाढलेले अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि पुढील होणारे रस्ते अपघातातील बळी थांबविण्यासाठी हजारोंच्या संख्येने लवकरच या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती तौफीक पटेल यांनी यांनी दिली. या रस्ते आंदोलनात ५० गांवात हजारो दुचाकीस्वार, शेतकरी, नागरिक, विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत, अशी महितीही तौफीक पटेल यांनी दिली.




Comment here