
माजलगाव : माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मंगलाताई प्रकाश सोळंके यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त माजलगाव येथे एक भव्य अभिष्टचिंतन सोहळा आणि सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन २० व २१ जुलै रोजी करण्यात आले आहे.
उद्या रविवार, २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम लोकनेते सुंदरराव सोळंके महाविद्यालय, माजलगाव येथे संपन्न होणार आहे. या प्रसंगी डॉ.प्रकाशराव आनंदगावकर, राजश्री हेमंत पाटील, आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार मोहनराव सोळंके, राधाकृष्ण होके पाटील, बाजीराव जगताप यांच्यासह बाबुराव पोटभरे, आर.जी.बजाज, जयसिंग सोळंके, विरेंद्र सोळंके यांची उपस्थिती असणार आहे. सत्कारमूर्ती मंगलाताई सोळंके या माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा असून मराठवाड्यात ‘अनाथांची माऊली’ अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव या प्रसंगी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजसेवेचा एक महत्वपूर्ण संदेश देण्यात येणार आहे. संध्याकाळी ६ वाजता थिएटर ऑफ रेलेव्हन्स तर्फे ‘द अदर वर्ल्ड’ हा मराठी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. सोमवार, २१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता गझल संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दुर्गेश सोनार, दत्तप्रसाद जोग, अमिता पैठणकर, आबेद शेख, आत्माराम जाधव, अविनाश काठवटे हे उपस्थित राहणार असून निवेदन कवी प्रभाकर साळेगावकर हे करणार आहेत.



Comment here