आपला जिल्हा

संकटात सापडलेल्या कुटुंबासाठी सोनेतारण खात्यावरील अपघाती विमा ठरला ‘संजीवनी’

बीड : अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव याच गावाचे रहिवासी रावसाहेब दगडू राठोड यांचा विजेचा धक्का लागून त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. नियतीच्या या क्रूर घाताने कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली होती.

मात्र, याच दुर्दैवी क्षणी तुळजाभवानी अर्बनने मदतीचा हात पुढे केला. रावसाहेब राठोड यांनी तुळजाभवानी अर्बनच्या सोनेतारण कर्ज घेतले होते आणि संस्थेने त्यांच्या या सोनेतारण खात्यावर अपघाती विमा उतरवला होता.ही तरतूद राठोड कुटुंबासाठी अनपेक्षितरित्या आशेचा किरण ठरली. रावसाहेब यांच्या निधनानंतर, तुळजाभवानी अर्बनने विमा प्रक्रियेला तातडीने गती दिली. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, रावसाहेब राठोड यांचा अपघाती विमा मंजूर झाला. यामुळे राठोड कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. संस्थेचे विभागीय अधिकारी अर्दड साहेब आणि शाखा व्यवस्थापक संभाजी डाके यांच्या उपस्थितीत, विमा संरक्षणाची 44,200 रूपये ही रक्कम कुटुंबाला सुपूर्द करण्यात आली.राठोड कुटुंबाला या कठीण काळात मिळालेला हा भावनिक आधार त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी नक्कीच बळ देईल. तुळजाभवानी अर्बन ही केवळ एक आर्थिक संस्था नाही, तर ती आपल्या ग्राहकांच्या अडीअडचणीत आणि अनपेक्षित संकटातही आपुलकीने त्यांच्या पाठीशी उऊभी राहते.

Comment here