माजलगाव : येथील बड्या धेंडांच्या ६ वारसांचा पोलिसांच्या धडक कारवाईने उघडकीस आला आहे. सुखसागर हाॅटेलमध्ये छापा टाकून जुगारी वारसांकडून ८ लाख ३५ हजार शंभर रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
माजलगाव शहरातील अनेक लॉजेसवर राजरोसपणे अवैध धंदे सुरू असून शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात असलेल्या हॉटेल सुखसागर या आलिशान हॉटेलवर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला, त्या ठिकाणी एका रूम मध्ये जुगार खेळताना शहरातील बड्या लोकांची सहा मुलं पोलिसांना आढळून आली असून त्यांच्या ताब्यातून जुगार साहित्य ८ लाख ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून या छाप्याची चर्चा होत आहे. शहरातील विविध लॉजेसवर राजरोसपणे अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू आहेत. त्यातच शहरात छत्रपती संभाजी महाराज चौकात असलेल्या आलिशान सुखसागर या हॉटेलमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्याने शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांनी तेथे छापा टाकला, त्यावेळी तेथील रूम नंबर २०१ मध्ये परिक्षीत सिद्धेश्वर जाधव, स्वप्निल अमरनाथ खुर्पे, श्रीधर अशोक रांजवण, विश्वजीत प्रताप रांजवण, पृथ्वीराज रघुनाथ शेजुळ, मनोज विठ्ठल सोळंके हे बड्या घरचे सहा तरूण तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह ८ लाख ३५ हजार शंभर रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या जुगाऱ्यांना शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांचे विरुद्ध जुगार कायद्यान्वये कारवाई केली. छाप्याची ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक केरबा माकणे, हवालदार शेख अस्लम, महेश चव्हाण, अंगद घोडके, सुनिल गवळी यांनी केली. दरम्यान, या हॉटेलमध्ये राजरोसपणे जुगार व इतर अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा आहे. दररोज हॉटेलच्या रूममध्ये जुगार खेळण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात, यामध्ये काही राजकीय मंडळी देखिल येत असतात. मात्र हॉटेल व्यवस्थापक सुरेश पुजारी यांनी आम्ही एका व्यक्तीच्या नावावर आधार कार्ड घेऊन रूम देतो, आत काय चालले माहिती नाही असे म्हणून हात झटकत असल्याने हॉटेल चालकावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. पोलिसांनी छापा टाकून पकडलेली मुले ही अतिशय श्रीमंतांची होती.
माजलगावची जुगारी हबच्या दिशेने वाटचाल
माजलगाव शहर या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. आता जुगारामुळे माजलगावचे नाव रडारवर आले आहे. शहरातील सुखसोयींनी युक्त हॉटेलमध्ये परभणी, बीड, पाथरी, मानवत या ठिकाणाहून जुगारी येतात. माजलगाव हे मराठवाड्यातील जुगारींचे हब होण्याच्या दृष्टीने हब होत आहे. या प्रकरणी बीडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी वेळीच लक्ष घालून कडक कारवाई करावी, अशी मागणी माजलगावकर करत आहेत.



Comment here