माजलगाव शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेले गणेशोत्सव, गौरी गणपती या सणांच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक राहुल लंगडे यांनी हे काम हाती घेतले आहे. सणांच्या काळात नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात, रात्रभर चालणारे कार्यक्रम, पूजा, मिरवणुकांमध्ये सहभागी होतात. त्यामुळे रस्त्यांवर अंधार असणे हे धोकादायक ठरू शकते. हे लक्षात घेऊन राहुल लंगडे यांनी वेळेपूर्वीच नियोजन करून संपूर्ण वार्डमध्ये पथदिवे बसवण्याची मोहिम सुरू केली आहे. राहुल लंगडे यांनी सांगितले की, “नागरिकांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. गणेशोत्सव आणि गौरीच्या सणासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री सुरक्षित वाटणं आवश्यक आहे. यासाठी सर्व प्रमुख रस्ते आणि गल्ल्यांमध्ये प्रकाशाची व्यवस्था करण्यात येत आहे.” स्थानिक नागरिकांनी देखिल या कामाचे स्वागत केले असून, सणासुदीच्या काळात उजळलेला वार्ड पाहून समाधान व्यक्त केले आहे. माजी नगरसेवक राहुल लंगडे यांच्या या कामामुळे वार्ड ४ मध्ये सणाचा उत्साह अधिकच वाढला आहे.


नागरिकांच्या प्रश्नांप्रती कायम तत्पर राहणार : राहुल लंगडे
गणेशोत्सव आणि गौरी गणपती हिंदू संस्कृतीची प्रतीकं आहेत. या काळात महिला, बालगोपाळ मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकीचा वसा घेत वार्ड क्रमांक ४ मध्ये सर्वत्र पथदिवे बसवून नागरिकांची गैरसोय दूर केली. नागरिकांचे प्रश्न आपण कायम तत्पर असल्याची प्रतिक्रिया राहुल लंगडे यांनी दिली.



Comment here