आपला जिल्हा

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड : ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवित आज शुक्रवार, दि.५ सप्टेंबरबशीरगंज चौक येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी अनेकांनी रक्तदान करुन या

या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी अनेक मान्यवरांनी रक्तादान केले. जगाला बंधूभाव आणि शांततेचा संदेश देणारे पैगंबर हजरत मोहम्मद स. यांचा योमे विलादत म्हणून १२ रब्बीउल अव्वल पान २ वर हा दिवस ईद-ए-मिलादुन्नबी म्हणून साजरा करण्यात येतो. आज शुक्रवारी दि.५ सप्टेंबर रोजी १२ रब्बीउल अव्वल असून या निमित्ताने बशीरगंज येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी वक्फ बोर्डाचे चेअरमन समीर काझी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फारुख पटेल, सुशिलाताई मोराळे, अश्फाक इनामदार, तहसिलदार चंद्रकांत शेळके, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनेकांनी रक्तदान करून या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सिटी ब्लड बँकेचे डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी संकलन केले.

Comment here