माजलगाव : सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना सभासदांच्या प्रगतीला प्राधान्य देणाऱ्या तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट या संस्थेला मोठा सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा “दिपस्तंभ पुरस्कार” संस्थेला प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचे वितरण सोमवार, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी गोकर्ण, कर्नाटक येथे आयोजित भव्य कार्यक्रमात करण्यात आले आहे. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शेजुळ यांनी दिपस्तंभ पुरस्कार स्वीकारला संस्थेच्या सर्वांगीण प्रगती, नाविन्यपूर्ण सेवा व सामाजिक बांधिलकीच्या कार्याचा सन्मान म्हणून हा गौरव मिळाल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले आहे.
“सभासदांच्या विश्वासाला मुकुट”
संस्थेच्या या यशाबद्दल अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ, मुख्य कार्यकारी अधिकारी शहाजी शेजुळ, तसेच संचालक मंडळ व सर्व कर्मचारीवृंद यांनी आनंद व्यक्त केला. “हा पुरस्कार म्हणजे आमच्या सभासदांच्या विश्वासाचे प्रतिक आहे. तुळजाभवानी अर्बनने सदैव सभासद व ग्राहककेंद्री काम केले आहे. भविष्यात आणखी आधुनिक सुविधा व उत्तम सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे,” असे अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ यांनी सांगितले. यशामुळे संस्थेच्या सर्व सभासदांमध्ये उत्साह नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी शहाजी शेजुळ यांनी व्यक्त केला.



Comment here