महा-राष्ट्र

मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मंगेश चिवटेंचा मदतीचा हात!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखांचा धनादेश केला सुपूर्द

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दीपावली-पाडवा निमित्त भेटून मंगेश चिवटे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी एक संवेदनशील आणि समाजहितकारी पाऊल उचलत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

या प्रसंगी मंगेश चिवटे यांनी सांगितले की, “पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे ही आजची गरज आहे. संकटाच्या काळात एकमेकांना हात देणं हीच खरी दिवाळीची भावना आहे.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करत मंगेश चिवटे यांचे सामाजिक बांधिलकीबद्दल अभिनंदन केले आणि समाजातील इतर तरुणांनाही अशा कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. ही भेट आणि मदतीचा उपक्रम ‘वर्षा’ निवासस्थानी पार पडला असून, दिवाळीच्या या सणात समाजसेवेची दीपज्योत उजळवणारा हा उपक्रम म्हणून सर्वत्र प्रशंसेचा विषय ठरला आहे.

मुंबई : वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे.

Comment here