माजलगाव : शहराच्या विकासासाठी समृद्धीसाठी आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी चाऊस मेहरीन शिफा बिलाल यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. चाऊस यांच्या माध्यमातून आम्ही शहराचा विकास करणार असल्याचे मोहन जगताप म्हणाले. तर विकास कामात टक्केवारी खाऊन भ्रष्टाचार करणाऱ्या आमदार प्रकाश सोळंके यांना नगर परिषदेच्या निवडणुकीतून हद्दपार करणार असल्याचे बाबुराव पोटभरे यांनी सांगितले.
मोहन जगताप यांच्या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष, नगरसेवक पदाचे उमेदवार बुधवार दि.१९रोजी जाहीर करण्यात आले. यावेळी जगताप माध्यमांशी बोलताना ती म्हणाली की, शहरात नागरी समस्या प्रलंबित आहेत. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. अशा पस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार निवडणुकीच्या मैदानात उतरला असून शहराच्या विकासाला आम्ही प्राधान्य देणार आहोत. असं सुतोवाचन पत्रकार परिषदेत पक्षाचे नेते मोहन जगताप यांनी केले. दरम्यान नाट्यगृह, आठवडी बाजार, पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तर बहुजन विकास मोर्चा मोहन जगताप सहाल चाऊस यांना सोबत घेऊन आमदार प्रकाश सोळंके यांना नगरपरिषद निवडणुकीत हद्दपार करणार आहे. ही लढत टक्केवारी खाऊन गलेलठ्ठ होणाऱ्या आमदार सोळंकेला धडा शिकवणारी असेल. असे बहुजन नेते बाबुराव पोटभरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला माजलगाव विधानसभा अध्यक्ष नारायण डक, कचरू खळगे,श्रीहरी मोरे, विश्वंभर थावरे, सहाल चाऊस, श्रीकृष्ण सोळंके, शकील कुरेशी, प्रभाकर नरवडे, विवेक पोटभरे, शरद यादव आदी उपस्थित होते.
उमेदवारीत या नावांची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चाऊस मेहरीन शिफा बिलाल हे तर प्रभाग १ अ) जया सागर दळवी, ब) शरद रामभाऊ यादव, प्रभाग २ अ) उज्वला सचिन जावळे, ब) चाऊस अबु तालेब आमेर, प्रभाग ३ अ) सय्यद अली नूर, ब) शेख नाझमीन इसाक, प्रभाग ४ अ) किशोर जालिंदर मेंडके, ब) कांताबाई रामराव मेंडके, प्रभाग ५ अ) सुचिता भारतराव होके, ब) चंद्रकांत सुधाकरराव देशुमख, प्रभाग ६ अ) गंगाबाई भागवत भोसले, ब) सय्यद लतीफ दिवान, प्रभाग ७ अ) संध्या सर्जेराव शिंदे, ब) शंकर कल्याणराव शेंडगे, प्रभाग ८ अ) शेख नुरजहाँ शेख शाहेद मणियार, ब) चाऊस सहालबीन आमेरबीन, प्रभाग ९ अ) कुरेशी महेमूद हबीब, ब) सीमा नारायणराव होके, प्रभाग १० अ) निला गोविंदराव इतापे, ब) खान इम्रान आगा, प्रभाग ११ अ) कुरेशी सुलताना शकील, ब) अजिंक्य वामनराव डक, प्रभाग १२ अ) लताबाई श्रीहरी वाघमारे, ब) सय्यद तौफीक दस्तगीर प्रभाग १३ अ) उषा अशोक लांडगे, ब) सय्यद अफसानबी सय्यद सलीम यांच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारी जाहीर झाल्या आहेत.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार चाऊस मेहरीन शिफा बिलाल



Comment here