आपला जिल्हा

३१ वेठबिगारांची जिल्हाधिकारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जनसाहस यांच्या संयुक्त विद्यमाने सोडवणूक

बीड : जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात जबरदस्तीने वेठीबिगारीला जुम्पल्या गेलेल्या ३१ जणांची सुटका बीडचे जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा निधी सेवा प्राधिकरण आणि जनसाहस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.

माजलगाव तालुक्यात केली कार्यवाही सर्व नागरिक या आदिवासी समाजाचे असून त्यांच्याकडून गत तीन महिन्यापासून बळजबरीने काम करून घेतल्या जात होते मारहाण व धमकी होत होते अशी तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी केल्यानंतर बीड जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख न्या.आनंद यावलकर, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन व बीड जिल्हा विधि सेवा प्राधिकरण सचिव न्या.वाहब सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ कामगारांची सुटका करण्यात आली. यावेळी माजलगावचे उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले, माजलगावचे तहसिलदार संतोष रूईकर,

बीड जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे अधिकार मित्र तत्त्वशिल कांबळे, माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालक कोळी, कामगार कामगार विभागाचे अजय लव्हाळे व इतर कर्मचारी उपस्थित होते. आज सर्व कामगारांची जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी भेट घेतली त्यांची समस्या जाणून घेतली व त्यांना शासकीय योजना विषयी माहिती दिली मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील यासाठीची माहिती दिली. तसेच सर्व कामगार जळगाव जिल्ह्यातील असल्यामुळे तेथील जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून मुलांना शिक्षणाची व्यवस्था करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच न्या.वाहब सय्यद यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्याशी संपर्क साधून या सर्व कामगारांना कायदेविषयक मोफत मधून मिळवून देण्याचे आश्वासित करण्यात आले.

Comment here