आपला जिल्हा

शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल मात्रे यांनी सद्गुरू श्री मिस्किन स्वामी संजीवन समाधीचे घेतले दर्शन

श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराजांचे घेतले शुभाशिर्वाद; प्रभाग क्रमांक सातमध्ये शिवसेनेची प्रचारात मुसंडी

माजलगाव : नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ (ब) मधील शिवेसेनेचे अधिकृत उमेदवार विठ्ठल भगवानराव मात्रे यांनी समस्त वीरशैव लिंगायत समाजाचे आराध्य दैवत सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संजीवन समाधीचे दर्शन घेत आणि मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांचे शुभाशिर्वाद घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी प्रभागातील नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान, प्रभाग ७ मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराने प्रचारात मुसंडी घेतली आहे.

माजलगाव नगरपरिषद निवडणूक रंगात आली असून प्रभाग क्रमांक ७ (ब) मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विठ्ठल भगवानराव मात्रे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ समस्त वीरशैव लिंगायत समाजाचे आराध्य दैवत सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन आणि मठाचे विद्यमान मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांचे शुभाशिर्वाद घेऊन प्रचारास दमदार सुरूवात केली. आपण केवळ विकासाच्या जोरावरच ही निवडणूक लढवत असल्याचे शिवसेनेचे उमेदवार मात्रे यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षात प्रभाग सातचा सर्वांगीण विकास झालेला नाही. हा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, शिवसेना बीड जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे हात बळकट करण्यासाठी आपणास मतदार साथ देतील, असा विश्वास मात्रे यांनी व्यक्त केला.

‘केवळ शिवसेनेकडेच विकासाचे व्हिजन’

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकाळात माजलगाव मतदारसंघात करोडोंचा निधी आला. आजही राज्याचे उप मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे यांचे बीड जिल्हा आणि माजलगाव मतदारसंघ, शहराकडे विशेष लक्ष असते. त्यामुळे केवळ शिवसेनेकडेच विकासाचे व्हिजन आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल भगवानराव मात्रे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

श्री सद्गुरू मिस्किन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांचे शुभाशिर्वाद घेताना विठ्ठल भगवानराव मात्रे दिसत आहेत.

Comment here