आपला जिल्हा

अंबाजोगाई पीपल्स बँकेची उत्तुंग भरारी!

‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड २०२५’ सन्मानासाठी निवड

 अंबाजोगाई : जागतिक सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल मराठवाड्याच्या सहकार क्षेत्रात प्रगतिपथावर असलेल्या अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह सहकारी बँक लि. अंबाजोगाई या बँकेस ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड २०२५’ पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, सहकार क्षेत्रात अंबाजोगाई पिपल्स बँकेने उत्तुंग भरारी घेतली आहे. अतिशय प्रतिष्ठेच्या ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड २०२५’ सन्मानासाठी निवड झाली आहे.

ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनच्या वतीने ही माहिती बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांना देण्यात आली आहे. रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी या पुरस्काराचे वितरण पुणे येथे आयोजित ‘सहकार मंथन – २०२५ ‘ या सहकार परिषदेत मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. बँकेने ग्राहकाचा विश्वास संपादन केलेला असून बँक सातत्यपूर्ण सर्वकष कामगिरी करत प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. ग्राहकांचे हक्क, हित जपणारी ही बँक आहे. बँकेने ६१२ कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. एनपीएचे व्यवस्थापन केले आहे. सर्वांनी बँकेच्या अभिनव सेवांचा आणि सुविधांचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन अंबाजोगाई पीपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

ही तर सहाकार क्षेत्राची मान उंचावणारी बाब : मोदी

जागतिक सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेचा ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड २०२५’ सन्मानासाठी अंबाजोगाई पिपल्स बँकेची झालेली निवड ही अंबाजोगाई पिपल्स बँक परिवारासाठी आनंदाची तर एकंदरित सहकार क्षेत्राची मान उंचावणारी आहे, अशा शब्दांत अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी प्रतिक्रिया दिली.

Comment here