केज : केज नगरपंचायतच्या मंगळवार दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील केज-बीड महामार्गावरील चौकास दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे नाव देण्याचा बहुप्रतिक्षित ठराव केज नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत मार्गी लागला. या निर्णयामुळे केज तालुक्यासह शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे.
लोकभावनेचा आदर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते हारूण इनामदार व केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड आणि नगरपंचायतचे सर्व नगरसेवक यांच्यासह नगरपंचायत चे अधिकारी कर्मचारी यांनी या चौकास लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याचा ठराव सदर बैठकीत एकमताने मंजूर केला. नाव देण्याची मागणी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश एकनाथ मुंडे यांनी सर्वप्रथम केली होती. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीनिमित्त दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी पत्रकार प्रकाश मुंडे आणि त्यांच्या सहकारी युवक मित्रांनी हा चौक ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब चौक’ म्हणून स्थापित करण्याची मोहीम सुरू केली होती.
याच लोकभावनेचा आदर करत, पत्रकार प्रकाश मुंडे यांनी नगरपंचायतकडे रीतसर ठराव दाखल केला होता, ज्याला आजच्या सभेत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हारूण इनामदार हे या ठरावाचे सूचक होते आणि तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. आभार आणि कौतुकाचा वर्षाव या ऐतिहासिक ठराव मंजुरीमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या सर्वांचे शिक्षक कॉलनी भागातील नागरिकांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. या निर्णयासाठी विशेषतः यांचे आभार व्यक्त करण्यात आले. नगराध्यक्षा सिताताई बनसोड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते या ठरावाचे सूचक हारूण इनामदार, नगरसेवक बालासाहेब जाधव यांच्यासह केज नगरपंचायत मधील सर्वपक्षीय नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी,पत्रकार प्रकाश मुंडे यांनी सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानताना सांगितले, “आज नगरपंचायतने लोकनेत्यांच्या नावाचा सन्मान करून जनतेच्या मागणीचा आदर केला आहे. यामुळे भावी पिढीला साहेबांचे कार्य प्रेरणा देत राहिल.” केज-बीड महामार्गावरील या चौकाला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे नाव मिळाल्याने, केज शहराच्या इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला आहे.
गटनेते हारूण इनामदार
नगराध्यक्षा सिताताई बनसोड



Comment here