आपला जिल्हा

उद्या किट्टीआडगावात महाआरोग्य शिबीर

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा लाभ घ्यावा : सरपंच रूक्मानंद खेत्रे 

माजलगाव : तालुक्यातील किट्टी आडगाव येथे राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत जिल्हा परिषद बीड व पंचायत समिती माजलगाव अंतर्गत मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाआरोग्य शिबिराचे आयोजन उद्या शुक्रवार, दि.१९ डिसेंबर रोजी करण्यात आले असून त्याचा गावातील सर्व ग्रामस्थांनी व गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच रूक्मानंद खेत्रे, उपसरपंच गोविंद आगे, ग्रामविकास अधिकारी महेश गेंदले यांनी केले आहे.

या शिबिरात विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडुन तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. यामध्ये डॉ.प्रताप लेंडाळ, डॉ.अर्चना मोरे, डॉ.गणेश आगे, डॉ.राधाकिसन डाके, डॉ.स्वाती जेथलिया, डॉ.सुमित कदम, डॉ.प्रशांत काळे यासह तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. दमा, छातीचे विकार, अस्थिरोग, महिलांची विवीध आजार व अनिमीया मुक्त गाव करण्याचे या शिबिराचे उद्दिष्ट्ये असून या महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन गटविकास अधिकारी जोत्स्ना मुळीक यांच्या हस्ते होणार आहे. शिबिरास तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मधुकर घुबडे यांची उपस्थिती असणार आहे. या गावातील सर्व ग्रामस्थांनी व गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच रूख्मानंद खेत्रे, उपसरपंच गोविंद आगे, ग्रामविकास अधिकारी महेश गेंदले यांनी केले आहे.

Bhagirath Todkari Administrator
Sorry! The Author has not filled his profile.
×
Bhagirath Todkari Administrator
Sorry! The Author has not filled his profile.
Latest Posts

Comment here