जुना मोंढा येथील श्री गणेश मंदिरात श्री स्वामी समर्थ सेवा, अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र, दिंडोरी प्रणीत बालसंस्कार विभागाच्या वतीने ग्राम अभियान अंतर्गत सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्षाचे २१ वेळा पठण करण्यात आले. एकूण १०,०८० आवर्तनांचा संकल्प यावेळी पूर्ण करण्यात आला. या कार्यक्रमास विष्णू मुंदडा, जगदीश चांडक, माधव सोळंके, मन्मथ लांडगे, भगवान लाटे, प्रदीप रुद्रवार, प्रकाश दुगड, संजय कोकड, जुगलकिशोर नावंदर, अजित भावठाणकर, रमेश चांडक, बाबासाहेब सरवदे, गणेश लोहिया, सुरेश बोराडे, रूपेश गडम, सुभाष रुद्रवार, दीपक शिनगारे, ओम भुतडा, रोहित नावंदर, प्रमोद मालाणी, शिवशंकर भंडारे यांच्यासह शेकडो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Comment here