आपला जिल्हा

पात्रुड गटात विकासाचा झंझावात; २.६८ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

“कामे करा, श्रेयही घ्या” जयसिंह सोळंके यांचे ठाम प्रतिपादन

माजलगाव : गेल्या ४० वर्षापासून दादा आमदार म्हणून मतदारसंघात विकास कामे करीत आहेत. हा निधी खेचून आणण्याची धमक आमदार म्हणून त्यांच्यात आहे. आपल्या जिल्हा परिषद गटात अनेक कामे झाले आहेत, आताही आपण शाळा इमारती आणि रस्ते कामासाठी अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन करीत आहोत. “लोकांची कामे आग्रहाने करा परंतु त्याचे श्रेयही घ्या डंके की चोट पे” कारण बाजारात बोलणाऱ्याची मातीही विकल्या जाते आणि गप्प राहणाऱ्याचे सोनेही नाही असे प्रतिपादन जिल्हा परिषद सभापती जयसिंह सोळंके यांनी व्यक्त केले. दरम्यान, पात्रुड जिल्हा परिषदेच्या गटात २ कोटी ६८ लाख रूपयाचे विकास कामांचे जयसिंह सोळंके यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

जिल्हा परिषदेच्या पात्रुड गटात बुधवार, दिनांक २१ जानेवारी रोजी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शाळा इमारती आणि सिमेंट रस्त्याचे २ कोटी ६८ लाख रूपयाचे भूमिपूजन कार्यक्रम झाले. यावेळी पात्रुड ग्रामपंचायत कार्यालय येथे उपस्थितांना ते मार्गदर्शन करत होते. जयसिंह सोळंके यांनी विकास कामांचा झंझावात सुरू करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, नेतृत्व करताना आपण आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आग्रही असले पाहिजे. तालुक्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहोत. दिवंगत आप्पानी, दादांनी हा मतदारसंघ घडवला आणि आता पुढे तो मतदारसंघ सांभाळण्याचे काम आपण सर्व सोबत मिळून काम करू. बीड जिल्ह्यात १ नंबरचा मतदारसंघ आपला असेही ते म्हणाले. दरम्यान, लोकांनी आपल्या गावातील विकास कामासाठी आपल्याला नेतृत्व करण्याची संधी दिलेली असते. कामेही करा आणि त्या केलेल्या कामाचे श्रेयही घ्या अशी त्यांनी सांगितले. दरम्यान पात्रुड गणातील ढोरगाव, लवुळ, पात्रुड, शिंदेवाडी, शिंदेवाडीतांडा, लहाम्हेवाडी, लोणगाव, उमरी या सात गावांत एकाच वेळी विकास कामांचा धडाका सुरू असून, वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न मार्गी लागत आहेत. यावेळी माजी सरपंच एकनाथ मस्के, माजी सभापती संभाजी शेजुळ, सरपंच लतीफ मोमीन, डॉ.वसिम मनसबदार, ग्रामसेवक भागवत भुजबळ, बाळासाहेब शिंदे, अर्जुन नाईकनवरे, दिपक शिंदे, शेख युसुफ, शेख तौफिक, चंदू गोमचाळे, सय्यद आसेफ, लिंबाजी सितकर इत्यादी ७ गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यासह ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.

Comment here