आपला जिल्हा

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने शोककळा; रविवारी माजलगावात शोकसभा

सर्व राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे : आमदार प्रकाश सोळंके

माजलगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचे आपघाती निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी माजलगाव तालुक्याच्या वतीने रविवार, दिनांक १ फेब्रुवारी रोजी सर्व राजकीय पक्ष व संघटनेच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान आपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून शासनाच्या वतीने तिन दिवसांचा दुखवटा जाहिर करण्यात आलेला आहे. माजलगाव येथे रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी गणपती मंदिर, जुना मोंढा, माजलगाव येथे सर्व राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने अजितदादा पवार यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comment here