आपला जिल्हा

अजितदादांच्या अस्थींचे मंजरथ येथे विसर्जन

जड अंतःकरणाने अखेरचा निरोप

मंजरथ : वेगाला हरवणारा माणूस आज वेगाशीच एकरूप झाला… या भावनेतून राज्याचे लोकप्रिय लोकनेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे आज शुक्रवारी सकाळी १० वाजता मंजरथ येथे जड अंतःकरणाने विसर्जन करण्यात आले.

कल्पनेपलीकडची ही दुर्दैवी घटना आजही मनाला स्वीकारणे कठीण जात आहे. मात्र नियतीने क्रूर थट्टा करत महाराष्ट्रावर ही कठीण वेळ आणली आहे. अस्थी विसर्जनाच्या वेळी उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू होते आणि वातावरण शोकमय झाले होते.

“अजितदादांचा वेग, त्यांची अपार ऊर्जा, निर्णयक्षमता आणि जनतेसाठी केलेले कार्य सदैव स्मरणात राहणार आहे. राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणि जनतेशी असलेली त्यांची थेट नाळ कायम मार्गदर्शक ठरणारी आहे. दादांच्या आठवणी जनतेच्या मनात सदैव जिवंत राहतील”, अशा भावना यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी जयसिंह सो॓ळंके, वडवणीचे नगराध्यक्ष शेषेराव जगताप, माजलगावचे उपनगराध्यक्ष सहाल चाऊस, राजेंद्र आनंदगावकर, बजरंग साबळे, संभाजी शेजुळ, अमोल जगताप, अर्जुन नाईकनवरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी मंजरथ येथे अत्यंत जड अंतःकरणाने दादांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.

Comment here