महा-राष्ट्र

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व स्वागत

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजुरकर, खासदार डॉ.कल्याणराव काळे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार अनुराधा चव्हाण तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू व राज्यपाल आचार्य देवव्रत हे भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने शेगाव जि.बुलडाणा कडे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

Comment here