उद्योजकांसाठी मोठे व्यासपीठ; २९ मार्चला आयोजन
पुणे : वीरशैव लिंगायत ग्लोबल ऑर्गनायझेशन (जागतिक संघटना) यांच्या वतीने उद्योजक, व्यापारी आणि युवकांना एकत्र आणण्यासाठी ‘एलबीएन एक्स्पो २०२६’ या एकदिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा एक्स्पो दि. २९ मार्च २०२६ रोजी पुणे येथील स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी असून सायंकाळी ६ ते ९ या वेळेत पारितोषिक कौतुक समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
लिंगायत बिझनेस नेटवर्क ग्रुप, पुणे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येत असलेल्या या एक्स्पोचे उद्दिष्ट समाजातील उद्योजक, व्यापारी तसेच शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था आणि व्यक्तींना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून लिंगायत समाजातील उद्योजक, डॉक्टर, अभियंते, चार्टर्ड अकाउंटंट, शिक्षक, व्यावसायिक, गृहिणी, विद्यार्थी तसेच तरुण-तरुणींना एकत्र येऊन संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
या एक्स्पोमध्ये विविध व्यवसायांची माहिती, नवीन व्यवसाय कल्पना, स्टार्टअप सुरू करण्यासाठी मार्गदर्शन, अनुभवी उद्योजकांशी प्रत्यक्ष संवाद तसेच नेटवर्किंग आणि सहकार्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच समाजातील यशस्वी व्यक्तींची ओळख करून देणे, व्यवसाय वृद्धीसाठी नवीन संधी निर्माण करणे आणि विविध उत्पादने पाहण्याची व खरेदी करण्याची संधीही यामध्ये उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, स्टॉल नोंदणी, व्हिजिटर नोंदणी व नामांकन नोंदणीसाठी स्टॉल नोंदणी : ८१४९७२५९४९, व्हिजिटर नोंदणी : ८०८७७९९८७५, नामांकन नोंदणी : ९४२१४५३०५१ / ९८९०४५९३७५ इच्छुकांनी आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी योगेश निर्मळे (८१४९७२५९४९), डॉ.मनोहर मुर्गे (९४२१४५३०५१), तेजस महाजन (९८९०४५९३७५), संतोष बनाळे (९३७१०१८९८१), पंकज नौबदे (८०८७७९९८७५) आणि रुपाली बेडजीरगे (९६८९१६९१२८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



Comment here