पोलीस अधिकाऱ्यांचा ‘कर्तव्यदक्षता व जनसेवा’ गौरव सोहळा
माजलगाव : सराफ सुवर्णकार समाजातील व्यापारी व कारागिरांना कायदेशीर मार्गदर्शन मिळावे तसेच कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने सराफ सुवर्णकार असोसिएशन, माजलगाव यांच्या वतीने IPC 411/BNS 317 संदर्भात भव्य मार्गदर्शन मेळावा आणि “कर्तव्यदक्षता व जनसेवा गौरव सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दि.१३ मार्च २०२६ रोजी दुपारी ४ वाजता शाहू नगर, माजलगाव येथील वैष्णवी मंगल कार्यालयात होणार आहे.
या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नवनित कांवत तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ यांच्यासह पोलीस दलातील इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके राहणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजेश रोकडे (चेअरमन, ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल) उपस्थित राहणार आहेत. यावेळी माजी आमदार राधाकृष्ण होके, आमदार विजयसिंह पंडित, ओमप्रकाश शेटे, मोहनराव जगताप, बाबुराव पोटभरे, उपनगराध्यक्ष सहाल चाऊस, माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालक कोळी, शिवाजी रांजणव, उमेश मोगरेकर, तुकाराम येवले, कल्याण आबुज, पांडुरंग उगले, प्रभाकर कुलथे यांच्यासह जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटना व सुवर्णकार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तसेच सचिन अंबिलवादे, गणेश बेद्रे (सुवर्णकार फेडरेशन), माधव निर्मळ (उद्योजक, बीड), मंगेश लोळगे, आनंत रुद्रवार, संतोष शेठ सोहनी आदी मान्यवर मार्गदर्शन करणार असून कायदे सल्लागार अॅड.दीपक देशमुख यांचे कायदेशीर मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सराफ सुवर्णकार असोसिएशन, माजलगावचे अध्यक्ष रामराजे रांजवण, सचिव गजानन बोकन आणि उपाध्यक्ष नारायण सातपुते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. समस्त सराफ सुवर्णकार बांधवांनी या मार्गदर्शन मेळाव्यास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे.



Comment here