माजलगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रीराम नवमी व संत कैकाडी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. या प्रसंगी भाजपा नेते ज्ञानेश्वर मेंडके, शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम येवले, भाजपा नेते ज्ञानेश्वर सरवदे, कैकाडी महासंघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव गायकवाड, मल्हार सेनेचे अशोक डोणे, राजेश जाधव, तुकाराम नावडकर, नेते प्रल्हाद दळवी, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास नेमाणे, सरपंच रूपालीताई कचरे, सौ. ज्योतीताई नेमाणे, विक्रम शिंदे, कृष्णा कानडे, मनोज कोरडे, अंकुश मेंडके, कैलास खुर्पे आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या माध्यमातून समाजातील गरजू रुग्णांना मदत करण्याचा संदेश देण्यात आला असून, रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
माजलगावात श्रीराम नवमी, संत कैकाडी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

माजलगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रीराम नवमी व संत कैकाडी महाराज जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.


Comment here