माजलगावात भाजपची संघटनात्मक ताकद वाढणार
माजलगाव : माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने बीएलए-१ विधानसभा प्रमुखपदी माधवराव निर्मळ यांची नियुक्ती केली असून, यामुळे मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियानाला गती मिळणार आहे.
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशकडून सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण अभियानांतर्गत माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी बीएलए-१ विधानसभा प्रमुख म्हणून माधवराव निर्मळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. या नियुक्तीमुळे माजलगाव विधानसभा क्षेत्रात भाजपच्या संघटनात्मक कामाला नवी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. बीएलए-१ विधानसभा प्रमुख या नात्याने माधवराव निर्मळ यांच्यावर मतदार याद्यांची पडताळणी, दुरुस्ती तसेच नव्या मतदारांची नोंदणी या महत्त्वाच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, माजलगाव विधानसभा क्षेत्रातील पुनर्निरीक्षण प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख हे जिल्हाभर काम पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर समन्वय साधून कामकाज अधिक प्रभावी करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. या नियुक्तीबद्दल पक्षाच्या विविध स्तरातून माधवराव निर्मळ यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
मतदार नोंदणी प्रक्रियेत प्रभावी कामगिरीचा विश्वास महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजाताई मुंडे, डॉ. प्रितमताई मुंडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात मतदार नोंदणी व पडताळणी प्रक्रियेत प्रभावी कामगिरी करू, असा विश्वास माधव निर्मळ यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, बीड जिल्ह्यासह माजलगाव मतदारसंघातील सर्व समाजघटकांतील कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन संघटन बांधणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



Comment here