माजलगाव : येथील श्री संस्थान मठात श्री सद्गुरू मिस्कीन स्वामी यांच्या संजीवन समाधी उत्सव सोहळ्यानिमित्त १७ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्री सद्गुरू मिस्कीन स्वामी यांच्या उत्सवानिमित्त संस्थान मठ, माजलगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लिंगैक्य श्री गुरू तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्या कृपाशिर्वादाने तसेच श्री गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात हा उपक्रम पार पडणार आहे. हे रक्तदान शिबिर शुक्रवार, दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी (चैत्र अमावस्या) सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत श्री संस्थान मठ, मठ गल्ली, माजलगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
समाजोपयोगी या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, तसेच आपल्या परिसरातील गरजू व्यक्तींनाही याची माहिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते आणि यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात, त्यामुळे या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी दिलेल्या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा
रक्तदान शिबिरासाठी नाव नोंदणी तसेच अधिक माहितीसाठी 9021224140, 9960740321, 9049948161, 9420001008, 9860120640, 9860618004, 7588333398, 9637184708, 8275852898, 9421162667, 9890718888, 8888268182 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री संस्थान मठातर्फे करण्यात आले आहे.



Comment here