आपला जिल्हा

माजलगावात ‘समता ज्योत रॅली’; समता, बंधुता आणि एकतेचा संदेश

माजलगाव : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त माजलगाव येथे ‘समता ज्योत रॅली’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासन, माजलगाव तसेच समस्त शिव-फुले-शाहू-आंबेडकरी अनुयायी यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली पार पडणार आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११ वाजता रॅलीला प्रारंभ होईल. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, भिमनगर येथे समारोप होणार आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून समतेची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. समता, बंधुता आणि सामाजिक एकतेचा संदेश समाजात रूजवण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमासाठी माजलगावचे उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले, माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल कुमार (भा.पो.से.), माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Comment here