माजलगाव : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त माजलगाव शहरामध्ये डीजेमुक्त मिरवणूक काढून समाजात एक आदर्श निर्माण केल्याबद्दल शहर पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी तीन जयंती मंडळांचा सत्कार केला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहर पोलीस ठाण्याच्या वतीने १० रोजी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी शहरातील विविध जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी जयंती दिवशी डीजेमुक्त मिरवणूक काढण्याचे आवाहन केले होते. सदर आवाहनास प्रतिसाद देऊन अशोकनगर येथील मिरवणुकीचे अध्यक्ष आनंद सूर्यकांत शिंदे, उपाध्यक्ष अनिल कांतीलाल भराटे, सचिव रोहित माणिकराव साळवे तसेच विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली जुना मोंढा भीमनगर मिरवणुकीचे अध्यक्ष गौतम सटवाजी निसर्गंध, उपाध्यक्ष धम्मपाल ज्ञानोबा कांबळे, यशोधरा बुध्द विहार फुलेनगर मिरवणुकीच्या अध्यक्षा सुशीला चांदमारे, उपाध्यक्ष राजकुमार सोनवणे, सचिव बाबासाहेब जाधव, कोषाध्यक्ष ॲड.रविंद्र टाकणखार, आकाश टाकणखार व महिला मंडळ यांनी डीजेमुक्त मिरवणूक काढून त्यामध्ये पारंपरिक वाद्य वाजवून जयंती साजरी केली. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केल्याबद्दल शहराचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व मंडळातील सुजाण नागरिकांना पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला.



Comment here