सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे आज शिवसेना पक्षाचा मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले होते. या दौऱ्यात त्यांनी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर येथे जाऊन विठुरायाचे भावपूर्ण दर्शन घेतले. मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची माहिती मंदिर समितीकडून घेतली. मंदिर कॅरीडोरचे काम स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच पूर्ण केले जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सन्मानाचा त्यांनी विनम्रपणे स्वीकार केला. या कार्यक्रमास रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार तानाजी सावंत, भगीरथ भालके, मंदिर समितीचे अध्यक्ष हभप सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर, तसेच मंदिर समितीचे पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन

पंढरपूर : येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात जाऊन भक्तीभावाने दर्शन घेतले तसेच मंदिर परिसरातील विकासकामांचा आढावा घेतला.


Comment here