शुक्रवार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी (चैत्र अमावस्या) सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने युवक, नागरिक व भाविकांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. समाजोपयोगी या उपक्रमातून अनेक रूग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार आहे. लिंगैक्य श्री गुरू तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्या कृपाशिर्वादाने श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थान मठाचे स्वयंसेवक व सर्व सहकार्य करणाऱ्यांचा श्रीगुरूंच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. तसेच भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांमध्ये भाविकभक्तांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.

माजलगाव मठातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजलगाव : येथील श्री संस्थान मठात श्री सद्गुरू मिस्कीन स्वामी यांच्या संजीवन समाधी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर उत्साहात झाले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद लाभला.


Comment here