महा-राष्ट्र

पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल हुसैन शाह यांच्या कुटुंबाला नवे घर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण

पहलगाम : जम्मू-कश्मीर येथे पर्यटकांचे प्राण वाचवताना शौर्याने बलिदान देणाऱ्या आदिल हुसैन शाह यांच्या कुटुंबासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन घर उभारून देण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला.

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना स्वतःचा जीव धोक्यात घालून प्राणार्पण करणारे आदिल हुसैन शाह यांच्या कुटुंबाला आधार देत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासाठी नवीन घर बांधून दिले आहे. या घराचे ऑनलाईन उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमास मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री योगेश कदम, कॅप्टन अभिजीत अडसूळ, युवासेना सचिव विकास गोगावले, अभिमन्यू खोतकर, काश्मीर संभाग शिवसेना अध्यक्ष मोहम्मद शफी मगरे तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम युवासेना निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांतून यशस्वीरीत्या पार पडला.

Comment here