गोवा : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. दिग्गज अभिनेत्याने वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोव्यामध्ये नाना पाटेकरांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावलामधील घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने मणिपाल रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण, रूग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. नानांच्या अकाली एक्झिटने मनोरंजनसृष्टी पोरकी झाली आहे.
हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी माध्यमांना दिली आहे. मराठी इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडही गाजवणाऱ्या नानांच्या अकाली एग्झिटने मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर. मराठी सिनेसृष्टीतले दिग्गज नाव. मराठी रंगभूमीपासून ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या नावाची दखल घ्यायला लावणाऱ्या गुणी अभिनेत्यांमध्ये आवर्जुन समाविष्ट होणारे नाव. रंगभूमीपासून आपली कारकिर्द सुरू करणाऱ्या नानांनी नंतर सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि एकापेक्षा एक दमदार सिनेमे दिले. नानांचा जॉनर काय? असा प्रश्न कुणी विचारण्याची हिंमतच करणार नाही. अगदी समांतर सिनेमांपासून, ते कॉमेडी सिनेमांपर्यंत नानांनी आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक हिंदी, मराठी सिनेमांमध्ये, नाटकांत भूमिका केल्या. नाना पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या. नानांचा मराठीत ‘नटसम्राट’ हा सिनेमा विशेष गाजला. खरे तर ‘नटसम्राट’ म्हटले तर, जुन्या पिढीला रंगभूमीवरचे श्रीराम लागू आठवतात. पण, सिनेमे पाहून मोठे झालेल्या पिढीला, जर विचारले तर मात्र त्यांच्या डोळ्यांसमोर रूपेरी पडद्यावर ‘नटसम्राट’ मोठे करणारे नाना पाटेकरच उभे राहतात.





Comment here