101 रक्तदात्यांनी केले रक्तदान
माजलगाव : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील पाटील साहेब प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीर घेतले. या शिबीरात 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले, अशी माहिती पाटील साहेब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राम नरवडे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेले सर्व नियम पाळून पाटील साहेब प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीचे आयोजन अभिनव पध्दतीने केले. अनावश्यक खर्चाला फाटा देवून सामाजिक दायित्व स्विकारत रक्तदान शिबिराचे आयोजन करून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. प्रारंभी माजलगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रतिष्ठाणच्या वतीने माजलगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी अभिवादन केले. याप्रसंगी पाटील साहेब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राम नरवडे, बीड जिल्हा युवासेनेचे शुभम डाके, जयंती अध्यक्ष गोविंद काळे, मयूर आमसुले, वैभव राऊत, दीपक जाधव, मयुर आगे, भगवान नवले, विश्वजीत होके, बाळासाहेब निंबाळकर, कार्तिक फपाळ, गणेश तौर, वीर झोडगे, अशोक मोरे, संतोष धिरडे, श्रीराम निंबाळकर, करण थोरात, अजय नरवडे, गोविंद लोखंडे, केशव साळुंके, बली मस्कर, केशव थोरात आदींची उपस्थिती होती. यावेळी शितल मंडप यांनी विशेष सहकार्य केले.
‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वांची अस्मिता’
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांची अस्मिता आणि प्रेरणास्थान आहे. त्यांची जयंती म्हणजे ऊर्जा देणारा सोहळा आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पाटील साहेब प्रतिष्ठानने शिवजयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित केले. या शिबिराला रक्तदात्यांनी मोठा प्रतिसाद दिला, हेच छत्रपती शिवाजी महाराजांना खरे अभिवादन आहे, असे प्रतिक्रिया पाटील साहेब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राम नरवडे यांनी दिली.
Comment here