युवासेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब मेंडके यांची मागणी
माजलगाव : शहरातील सर्व्हे नंबर 385 मधील शिल्लक असलेली जागा व्यायामशाळेसाठी संपादित करून देण्यात यावी अशी मागणी युवासेनेचे माजलगाव तालुकाप्रमुख बाळासाहेब मेंडके यांनी एका निवेदनाद्वारे नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात बाळासाहेब मेंडके यांनी म्हटले आहे की, माजलगाव शहराच्या हद्दीत सर्व्हे नंबर 385 मध्ये शिल्लक जागा आहे. या जागेचा सदुपयोग करण्यासाठी शासनाने व्यायामशाळेसाठी सदर जागा संपादित करून उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून या ठिकाणी तरूण युवकांना व्यायामासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होईल. नगरपालिका प्रशासनाने लक्ष घालून सदर जागा उपलब्ध करून दिली तर साहेब प्रतिष्ठानच्या वतीने व्यायामाचे साहित्य मोफत दिले जाईल, तरी या मागणीकडे नगरपालिकेने सहानुभूतीपूर्वक विचार करून जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बाळासाहेब मेंडके यांनी लावून धरली आहे. याप्रसंगी शेख रहिम यांची उपस्थिती होती.
व्यायामशाळेस बाळासाहेब ठाकरे यांचे नाव हवे
युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब मेंडके
माजलगाव शहर आणि परिसरात सर्व साधन युक्त व्यायामशाळेची गरज असून नगरपालिकेने शिल्लक जागा व्यायामशाळेसाठी प्राधान्यक्रमाने द्यावी आणि या व्यायामशाळेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
Comment here