आपला जिल्हा

वारकरी प्रबोधन सेवा मंडळाची बीड जिल्हा कार्यकारिणी घोषित

बीड : वारकरी प्रबोधन सेवा मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.रमेश महाराज वाघ यांनी सोमवारी सायंकाळी बीड जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प.कालिदास महाराज नाईकनवरे यांची निवड करण्यात आली.

वारकरी प्रबोधन सेवा मंडळाची बीड जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे, उपाध्यक्ष- ह.भ.प.महारूद्र महाराज पवार, सचिव- ह.भ.प.मोहन महाराज सावंत, प्रवक्ते- ह.भ.प.परमेश्वर महाराज मोरे, कार्याध्यक्ष- ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज लांब, सल्लागार- ह.भ.प.दत्तात्रय महाराज गिरी आदींनी निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

माजलगाव तालुकाध्यक्षपदी
ह.भ.प.परमेश्वर महाराज सोजे

वारकरी प्रबोधन सेवा मंडळाच्या माजलगाव तालुकाध्यक्ष ह.भ.प.परमेश्वर महाराज सोजे यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष – ह.भ.प.गोपाळ महाराज नरके, सचिव – विजय महाराज बादाडे, कार्याध्यक्ष – ह.भ.प.धर्मराज महाराज सोळंके, प्रचारप्रमुख – भगीरथ तोडकरी, संपर्कप्रमुख – उध्दवराव ताकट, सहसचिव ज्ञानेश्वर जाधव, सरचिटणीस – ह.भ.प.अंगद महाराज डाके, सहसरचिटणीस – ह.भ.प.विष्णु महाराज बादाडे, प्रवक्ते – ह.भ.प.उध्दव महाराज ठोंबरे, सल्लागार अॅड.सुरेशराव सोळंके, संघटक – ह.भ.प.माऊली महाराज जगताप, खजिनदार दत्ता डाके, आंदोलनप्रमुख ह.भ.प.माऊली महाराज जाधव आदी कार्यकारिणी घोषित करून नियुक्तीपत्र देण्यात आली.

‘वारकरी मंडळा’च्या प्रचारप्रमुखपदी भगीरथ तोडकरी


माजलगाव : वारकरी प्रबोधन सेवा मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.रमेश महाराज वाघ यांच्या हस्ते माजलगाव तालुका प्रचार प्रमुखपदाचे नियुक्तीपत्र स्विकारताना वर्तमान माध्यम समुहाचे संंपादक भगीरथ तोडकरी, याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ह.भ.प.कालिदास महाराज नाईकनवरे, जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प.महारूद्र महाराज पवार, ज्येष्ठ पत्रकार तुकाराम येवले, बालासाहेब फपाळ पाटील.

Comment here