विशेष वार्ता

अविरत रूग्णसेवेची साडेतीन दशके

डाॅ.श्यामसुंदर काकाणी यांचा प्रेरणादायी प्रवास

माजलगाव : आरोग्य क्षेत्रात गेली ३५ वर्ष अविरत रूग्णसेवा करणारे डाॅ.श्यामसुंदर काकाणी यांचे आरोग्य क्षेत्रातील काम दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा माजलगावचे अध्यक्ष या नात्याने कोरोना काळातही एखाद्या योध्दासारखे लढत आहेत.

डाॅ.काकाणी यांच्या नावावर अनेक विक्रम प्रस्थापित आहेत. बालरोगांविषयी अत्याधुनिक सुविधा माजलगावात पहिल्यांदा डाॅ.काकाणी यांनी उभारली. निष्णात तज्ज्ञ असलेल्या डाॅ.श्यामसुंदर काकाणी यांनी रूग्णांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य मानून गेली ३५ वर्ष अविरत कार्य सुरू आहे. कांगारू मदर केअर ही दुर्मिळ आजारांवर आंतरराष्ट्रीय पातळीवरील उपचार पध्दती बीड जिल्ह्यात प्रथम सुरू करण्याचा डाॅ.काकाणी यांना जातो. दुर्मिळ आजारांवर काम करत असताना मराठवाडा आणि राज्य पातळीवर बालरोग तज्ज्ञांना प्रशिक्षित करण्याचे काम डाॅ.काकाणी सर्व व्याप सांभाळून करत आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदा सोनोग्राफी सुविधा सुरू करण्याचा मानही त्यांनाच जातो. १९९३ साली गर्भ सोनोग्राफीचे प्रशिक्षण घेऊन रूग्णांना दिलासा देत योग्य निदान आणि उपचार केले. २००७ साली नवजात अर्भक पुनरूज्जीवन या महत्त्वाच्या विषयावर राष्ट्रीय व्याख्याता म्हणून डाॅ.श्यामसुंदर काकाणी यांची निवड झाली. राष्ट्रीय व्याख्याता म्हणून काम करत असताना देशपातळीवरील विविध बालरोग तज्ज्ञांना मार्गदर्शन आणि सल्ला देण्याचे काम डाॅ.काकाणी यांनी केले. राष्ट्रीय व्याख्याता म्हणून त्यांची नियुक्ती झाली, त्याचा अनेक रूग्णांना लाभ झाला. गेली ३५ वर्ष बालरोग तज्ज्ञ म्हणून माजलगाव शहर, परिसर, तालुका आणि जिल्ह्यातही अनेक नवजात बालकांना जीवदान देण्याचे काम त्यांनी केले आहे.


इ.स.2007 मध्ये आंतरराष्ट्रीय सोनोग्राफी परिषदेत जगविख्यात शास्त्रज्ञ प्रो.डाॅ.फिलीप जियान्टी यांच्या समवेत डाॅ.श्यामसुंदर काकाणी आणि डाॅ.सौ.सुनंदा काकाणी.

गर्भातही कोरोना होण्याची भीती

कोरोना महामारीशी आपण सर्वजण लढत आहोत. त्याचा मुकाबला मोठ्या हिंमतीने करण्याची गरज आहे. कोरोना हा अतिसंसर्गजन्य रोग असल्याने त्याकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे, असे आवाहन वर्तमानशी बोलताना डाॅ.श्यामसुंदर काकाणी यांनी केले. कोरोना रूग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने ही गंभीर बाब आहे. कोरोना नवजात शिशुला गर्भातही होवू शकतो, अशी भीती डाॅ.काकाणी यांनी व्यक्त केली आहे.

Comment here