विशेष वार्ता

तेलगावला या, ‘बीग बाॅस’च्या घरात

ग्रामीण हेअरस्टाईलला शहरी टच; तरूण उद्योजक बलराज राऊत यांची संकल्पना

तेलगाव : ग्रामीण भागात हेअरस्टाईलला शहरी टच देवून नवतरूणांना हव्या त्या स्टाईल उपलब्ध करून देणारे तेलगाव येथील बीग बाॅस हे सलून जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरले आहे. नवतरूणांना खुणावणारे बीग बाॅस हे सलून तेलगावस्थित शंकर काॅम्लेक्स धारूर रोड येथे आहे.

कल्पक दृष्टी असलेले बीग बाॅसचे संचालक बलराज राऊत आपल्या हटके स्टाईलमुळे नवतरूणांच्या गळ्यातील ताईत बनत चालले आहेत. बीग बाॅस नाव धारण करून स्वतःचा ब्रँण्ड विकसित करण्यावर बलराज राऊत यांचा भर आहे. पुणे, मुंबई येथील सर्व्हिस तेलगाव सारख्या ठिकाणी देणे म्हणजे मोठी रिस्क होती. मात्र प्रोफेशनल सलून व्यवसाय काय असतो. याची ओळख बीग बाॅसच्या माध्यमातून बलराज राऊत तरूणांना देतात. बीग बाॅस या नावाबद्दल बोलताना बलराज राऊत म्हणाले, बीग बाॅस हे नाव जरा हटके आणि दम असलेले नाव आहे. त्यामुळे पत्नी ज्योती आणि मी दोघांनी मिळून बीग बाॅस हे नाव देण्याचे निश्चित केले. ग्रामीण भागात बीग बाॅस हा ब्रँण्ड होत आहे, असेही बलराज राऊत म्हणाले. आजच्या नव्या पिढीकडे बघून बीग बाॅस संकल्पना अंमलात आणली आणि ग्राहकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे आमची संकल्पना नवतरूणांना भावली, असल्याचेही राऊत म्हणाले. ग्रामीण भागात अत्याधुनिक सुविधा देणारे सलून उभा करणे म्हणजे माझ्यासाठी दिवास्वप्न होते. पण माझ्या स्वप्नांना बळ देण्याचे काम गोरख सोनटक्के यांनी केले. लाॅकडाऊनच्या काळात सलून सुरू झाले त्यामुळे व्यवसायाला मोठा फटका बसला. तरीही आता लाॅकडाऊन शिथील झाल्याने ग्राहकांचा रिस्पॉन्स वाढत आहे. तरूण व्यवसायात उतरण्याऱ्या तरूणांनी केवळ दाढी आणि कटींगमध्ये गुंतून न जाता इतर सेवा द्याव्यात, असेही बलराज राऊत म्हणाले. बीग बाॅसचे वैशिष्ट्ये सांगताना बलराज राऊत म्हणाले, हेअर स्पा ही मशीन उपल्बध केली असून तरूणांच्या आकर्षणाचा केंद्र ठरत आहे. पुणे, मुंबई येथील सेवा तेलगाव सारख्या ग्रामीण भागात मिळत असेल तर ग्राहक हक्काने का येणार नाहीत असाही विश्वास बीग बाॅसने दिला. ज्यांना हेअरस्टाईल आवडते त्यांनी बीग बाॅसला भेट द्यावी असा सल्ला बलराज राऊत देतात. बीग बाॅसमध्ये नववधू आणि वरांच्या मेकअपची सुविधा उपलब्ध आहे, अशीही माहिती राऊत यांनी दिली.

बलराज राऊत

‘बीग बाॅस’साठी पुण्यात ३ वर्षे प्रशिक्षण

ग्रामीण भागात नवतरूणांना डोळ्यासमोर ठेवून बीग बाॅस हे प्रोफेशनल सलून सुरू करण्यासाठी तीन वर्षे पुण्यात वेगवेगळ्या नामांकित सलूनमध्ये प्रशिक्षण घेतले. यात जावेद हबीबचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. बीग बाॅसच्या पुढील वाटचालीत दिंद्रुड आणि वडवणी येथे शाखा सुरू करण्याचा आपला मानस असल्याचेही बलराज राऊत म्हणाले.

Comment here