नाविन्यपूर्ण ईलेक्ट्रानिक्स उपकरणांचे दालन खुले
माजलगाव : ग्राहकांना नाविन्यपूर्ण ईलेक्ट्रानिक्स उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी रिलायन्स ग्रुपने देशभरात सुरू केलेल्या जिओ डिजीटल मार्टच्या दालनाचे माजलगावस्थित छत्रपती संभाजी महाराज चौक येथे लाँचिंग करण्यात आले. बीड जिल्ह्यातील या पहिल्या जिओ डिजीटल मार्टचा शुभारंभ शुक्रवार, दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता वर्तमान माध्यम समुहाचे मुख्य संपादक भगीरथ तोडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.
या शुभारंभाप्रसंगी जिओ केंद्रीय व्यवस्थापक धिरज सिन्हा, सौरभ महाजन, गणेश भाळशंकर, विठ्ठल गवळी, ज्ञानेश्वर शिंदे, उबेद इनामदार, शेख नदीम, दत्ता सोनटक्के, रणवीर काबला आदी मान्यवरांची उपस्थिती होती. रिलायन्स ग्रुपने देशभरात ईलेक्ट्रानिक्स उपकरणांच्या नाविन्यपूर्ण ऑनलाईन शाॅपिंगचे दालन खुले केले आहे. जिओ डिजीटल मार्टमुळे ग्राहकांना ईलेक्ट्रानिक्स उपकरणे खरेदी करणे सहज आणि सोपे होईल. बीड जिल्ह्यातील पहिल्या जिओ डिजीटल मार्टचे माजलगावात दालन उभे राहीले. यामुळे माजलगाव शहर, परिसर आणि तालुक्यातील ग्राहकांना ईलेक्ट्रानिक्स उपकरणे खरेदी करणे सोपे जाईल. या दालनामध्ये ऑनलाईन उपकरणे खरेदीवर भरघोस सूट देण्यात आलेली आहे. जेणेकरून ६० टक्क्यांपर्यंत आकर्षक सवलत मिळणार आहे, अशी माहिती धिरज सिन्हा यांनी दिली.
जिओ डिजीटल मार्ट पसंतीस उतरेल : भगीरथ तोडकरी
जिओ डिजीटल मार्टच्या शुभारंभप्रसंगी बोलताना भगीरथ तोडकरी म्हणाले, या ईलेक्ट्रानिक्स दालनामुळे दर्जा आणि गुणवत्ता जपणारी उपकरणे ग्राहकांना उपलब्ध होतील. जिओ डिजीटल मार्टमुळे तरूणपिढी रिलायन्स ग्रुपशी जोडली जाईल. या दालनामध्ये विविध ब्रॅण्डेड कंपण्यांचे मोबाइल्स, लॅपटॉप्स, टेलिव्हिजन्स, एसी, वॉशिंग मशीन्स, रेफ्रिजरेटर्स आदी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत. त्यामुळे जिओ डिजीटल मार्ट पसंतीस उतरेल, असे गौरवोद्गार भगीरथ तोडकरी यांनी काढले.
Comment here