एका दिवसात १४ शाखा स्थापनेचा विक्रम
माजलगाव : शिवसेनेला अप्पासाहेब जाधव यांच्या रूपाने धडाकेबाज जिल्हाप्रमुख मिळाला असून एका दिवसात शिवसेनेच्या तब्बल १४ शाखा स्थापन करण्याचा विक्रम अप्पासाहेब जाधव यांच्या नावावर नोंद झाला आहे.
शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब कडाजीराव जाधव यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर १२ ते २४ जुलै या कालावधीत शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवून जिल्ह्यात वेगळी छाप निर्माण केली. माजलगाव, वडवणी, किल्लेधारूर, केज, अंबाजोगाई आणि परळी वैजनाथ या सहा तालुक्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंपर्क मोहिम राबवून जनतेशी संवाद साधला. सहा तालुक्यातील पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावांत भेट देवून शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सरकारने केलेल्या विविध विकास कामांची माहिती देण्यात आली. शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख म्हणून अप्पासाहेब जाधव यांची वाटचाल धडाकेबाज सुरू आहे. संघटन आणि विकासात्मक कामे करत अप्पासाहेब जाधव यांनी जिल्ह्यात शिवसेनेला नवसंजीवनी दिली आहे. सहा तालुक्यात एकाच दिवसात शिवसेनेच्या तब्बल १४ शाखा स्थापन करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
शिवसेना स्टाईलमुळे शेतकऱ्यांना मिळाले ऊस बिले
कळंब येथील शंभू महादेव साखर कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बीले तब्बल ५ महिन्यांपासून प्रलंबित ठेवली होती. शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या कुशल नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाचे यश म्हणून शंभू महादेव साखर कारखान्याने तातडीने धनादेश काढले. आंदोलनातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून अप्पासाहेब कडाजीराव जाधव यांच्याकडे पाहिले जाते. जनसामान्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन उभारणारे जिल्हाप्रमुख म्हणून अप्पासाहेब जाधव यांची मराठवाड्यात वेगळी ओळख निर्माण होत आहे.
Comment here